Vantara :  सो कुल… मडबाथ, शॉवर अन् मुक्त विहार, बघा वनतारात हत्तींवर कसे होतात उपचार?

Vantara : सो कुल… मडबाथ, शॉवर अन् मुक्त विहार, बघा वनतारात हत्तींवर कसे होतात उपचार?

| Updated on: Aug 07, 2025 | 2:03 PM

हत्तींना देण्यात येणारी हायड्रोथेरपी म्हणजे हत्तींना एका मोठ्या तलावात किंवा पाण्याच्या खास कुंडात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. या थेरपीमुळे हत्तींच्या सांधेदुखी, स्नायूंचे दुखणे आणि पायांच्या जखमा कमी होण्यास मदत होते. तसेच, पाण्याच्या दाबामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्यांना आराम मिळतो.

माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये परत आणण्याचा प्रयत्न सुरू असताना, वनताराने तिच्या देखभालीसाठी आणि तिच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, सध्या वनतारामध्ये माधुरी असून तिची काळजी कशी घेतली जाते? वनतारात हत्तींवर कसे होतात उपचार? हे जाणून घेण्यासाठी वनतारात टीव्ही ९ ची टीम दाखल झाली आहे.

वनतारा केंद्रात रेस्क्यू केलेल्या हत्तींची काळजी घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जाते. यामध्ये हत्तींच्या आरोग्याची नियमित तपासणी करणं, काही आजार असल्यास, आवश्यकतेनुसार लेझर थेरपी, एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड सारख्या अत्याधुनिक सुविधांनी उपचार देणे, प्रत्येक हत्तीच्या वयानुसार, आरोग्याच्या स्थितीनुसार आणि गरजेनुसार त्यांच्यासाठी खास आहार देण्याची व्यवस्था, हत्तींना मोकळ्या वातावरणात फिरता यावे यासाठी मोठे हत्तीकॉरिडोर आणि जंगल सदृश जागेची व्यवस्था वनतारा येथे आहे.

Published on: Aug 07, 2025 12:21 PM