Mahadevi Elephant :  महादेवी कोल्हापुरात परत येणार? ‘वनतारा’नं नेमकं काय म्हटलं अन् सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

Mahadevi Elephant : महादेवी कोल्हापुरात परत येणार? ‘वनतारा’नं नेमकं काय म्हटलं अन् सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

| Updated on: Aug 07, 2025 | 2:05 PM

महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिलेत. त्यासाठी अधिकृत वन्यजीव खात्यानं तसेच जैन मठानं न्यायालयामध्ये कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्व नियमांचे पालन करण्यात आले पाहिजे. न्यायालयाने आदेश दिल्यास वैद्यकीय देखरेखी खाली पाठवण्याची तयारी आहे.

कोल्हापूरच्या नांदणी मठामध्ये गेली 34 वर्ष असणाऱ्या महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पात नेण्यात आलं आहे. आणि या विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाल्या असून कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आक्रमक झाले तर या प्रकरणी वनताराने देखील स्पष्टीकरण दिले आहे महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिलेत आणि यासाठी अधिकृत वन्यजीव खात्याने आणि जैन मठाने न्यायालयामध्ये कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे जर न्यायालयाने आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन्यजीवांच्या हस्तक्षेपामध्ये सुरक्षित रित्या पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी असल्याचं वनताराकडून सांगण्यात आलेला आहे.

महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांच्या ऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे, यावर भर देत वनतारामध्ये स्थलांतर करण्यावर शिक्कामोर्तब केलं. हत्तीणीची नाजूक तब्येत, मानसिक अवस्था सुधारण या गोष्टी न्यायालयाने विचारात घेतल्या. महादेवी वनतारामध्ये 30 जुलैला आल्यापासून विशेष पशुवैद्यकीय उपचार खाली ठेवण्यात आली. महादेवी हत्तीणीवर सांधेदुखीचा उपचार सुरू आहे. एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड यासह रेडिओलॉजिकल रोगनिदान साखळीदंड विरहित आणि चांगली राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे महादेवी हत्तीणीची मानसिकता आणि आरोग्य सुधारत असल्याचं वनताराने सांगितले. अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतर सुद्धा आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारत आहे, असं वनताराकडून स्पष्ट करण्यात आलंय.

Published on: Aug 05, 2025 12:23 PM