MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 November 2021

| Updated on: Nov 10, 2021 | 8:46 AM

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर तर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आहेत. या संमेलानासाठी गीत तयार करण्यात आले असून मिलिंद गांधी गीतकार तर संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे.

Follow us on

नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र संमेलनाच्या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख नसल्यामुळे वादाला तोंड फटले आहे. सावरकरांचा गीतामध्ये उल्लेख नसल्याचे समोर आल्यामुळे मनसे कार्यलयात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेने केलीय.

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर तर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आहेत. या संमेलानासाठी गीत तयार करण्यात आले असून मिलिंद गांधी गीतकार तर संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. मात्र या गीतात सावरकर यांचा उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त केली जातेय. सावरकर नाशिकचे भूमीपुत्र असूनदेखील त्यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबतची नाराजी छगन भुजबळ यांना कळवणार असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेतर्फे भुजबळ यांच्याकडे केली जाणार आहे.