MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 13 October 2021

| Updated on: Oct 13, 2021 | 8:10 AM

ओबीसी समाजाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्यामुळे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याच कारणामुळे बुधवारी (13 ऑक्टोबर) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते हजर राहणार नाहीत. यापूर्वीदेखील ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनुपस्थित होते.

Follow us on

ओबीसी समाजाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्यामुळे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याच कारणामुळे बुधवारी (13 ऑक्टोबर) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते हजर राहणार नाहीत. यापूर्वीदेखील ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनुपस्थित होते. विशेष म्हणजे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असताना दुसरीकडे विजय वडेट्टीवार नागपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे खरंच ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी निधी दिला जात नाहीये का ? असा सवाल आता विचारण्यात येतोय.