MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 11 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 11 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 7:15 PM

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास सर्व प्रमुख नेते आज रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. महाराष्ट्र बंद शांततेत पाळला जावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. मात्र ठाण्यासह काही ठिकाणी बंदला गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर आज सकाळपासूनच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. ठाण्यात उपमहापौर यांचे पती पवन कदम आणि काही सहकाऱ्यांसह महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र, त्यावेळी रिक्षा वाहतूक सुरु असल्याचं पाहून त्यांनी रिक्षाचालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने तर हातात काठी घेत येणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकांना मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. पवन कदम यांनीही एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती लागलाय.

ठाण्यातच सकाळी एक रिक्षा चालक रस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालत होता. त्यामुळे पोलिसांनी या रिक्षा चालकाला पोलीस व्हॅनमध्ये टाकले आणि त्याला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कॅमेऱ्यावर हात ठेवून हे चित्रीकरण थांबवले.