Amravati : घरात घुसून घोटला गळा अन्… महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या, नेमकं घडलं काय? अमरावतीत खळबळ
अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिला पोलिस अधिकाऱ्याची तिच्या घरात हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस या हत्येचा तपास करत आहेत.
अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमरावतीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरात शिरून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस अधिकाऱ्याची तिच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आशा घुले असे असून त्या ३८ वर्षांच्या होत्या. आशा घुले यांची हत्या का आणि कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुरुकृपा कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. आशा घुले या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये नोकरी करत होत्या. त्यांच्या घरातच त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून आशा घुले यांचे पती राज्य राखीव पोलीस दल क्रमांक ९ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येतेय. तर जेव्हा महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाली तेव्हा त्यांचा पती मुलांसह बाहेर गेला होता. आशा घुले या १३ तारखेपासून सुट्टीवर होत्या. त्यांना चौदा वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता ती घरी एकटी होती. तिचा पती, मुलगी आणि मुलगा बाहेर गेले होते, अशी माहिती मिळतेय.
