Kolhapur | लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं

Kolhapur | लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं

| Updated on: Mar 30, 2022 | 12:25 PM

शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप (Teacher Beaten up) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच लहान मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे.

शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप (Teacher Beaten up) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच लहान मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती मुलीने आपल्या आई-वडिलांना दिली, त्यानंतर हा प्रकार घडला. शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.  यामध्ये अनेक जण शिक्षकाला अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसत आहेत. तर एक महिला दप्तराने त्याला मारहाण करताना पाहायला मिळत आहे. संबंधित शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती आहे.