मॉर्निंग वॉक करताना महिलेचा पाठलाग करून अश्लिल वर्तन करणारा माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात

मॉर्निंग वॉक करताना महिलेचा पाठलाग करून अश्लिल वर्तन करणारा माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात

| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 11:58 AM

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर टवाळखोराला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर टवाळखोराला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबईजवळच्या वसईत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. संबंधित महिला आज (शुक्रवार) सकाळी सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग करत होती. त्यावेळी शेष पाल नावाच्या तरुणाने तिचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. वसईतील पश्चिम भागात सनसिटी परिसरात ही घटना घडली आहे.