Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार?

Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार?

| Updated on: Apr 01, 2026 | 5:52 PM

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. आज रात्री त्या नवी दिल्ली येथे दाखल होणार असून उद्या त्या NDAमधील काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. आज रात्री त्या नवी दिल्ली येथे दाखल होणार असून उद्या त्या NDAमधील काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. दरम्यान, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) काही नेत्यांवर दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटींतून पुढील रणनीती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Apr 01, 2026 5:52 PM
Follow Us