Weather Updates : आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
Maharashtra disaster report : गेल्या 24 तासांचा आपत्ती विभागाचा अहवाल समोर आला आहे. या 24 तासांमध्ये 18 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद आहे.
आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल आता समोर आलेला आहे. रत्नागिरीत सर्वाधिक 112 मिमी, तर सिंधुदुर्गात 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, या 24 तासांमध्ये 18 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळालं आहे. 65 नागरिक जखमी असल्याची देखील माहिती समोर आली आहे. मृत नागरिकांच्या अकडेवारीत कुंडमळा येथील पूल दुर्घटनेतील नागरिकांचा देखील समावेश आहे.
येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. शिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसंच पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात देखील ऑरेंज अलर्ट असणार आहे. मुंबई शहरात देखील 100 मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तर मुंबई उपनगरात 86 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांचा हा आपत्ती विभागाचा अहवाल आहे.
Published on: Jun 16, 2025 04:29 PM
