शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी; रोहित पावरांचा धक्कादायक दावा
अलीकडेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची महिती समोर आली होती. कॅबिनेट्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी जाहीर केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली
अलीकडेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची महिती समोर आली होती. कॅबिनेट्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी जाहीर केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. यानंतर कॅबिनेट्या बैठकीत थेट मान्यता मिळाली मात्र आचारसंहितेमुळे अधिकृत घोषणा थांबल्याचं समोर आलं होतं. मात्र या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, अटीतटींवर दिली जाणारी ही कर्जमाफी फसवी असल्याचं भासत आहे. राज्यातील अनेक शेतकरी अजूनही संकटात असून त्यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार का, याबाबत शंका असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत सरसकट समावेश करावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे. तसेच सरकारला सरसकट कर्जमाफी करण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.