CM Meet PM Modi : फडणवीसांची मोदींशी तासभर चर्चा, दिल्लीतून महाराष्ट्राला किती निधी अन् काय दिलं आश्वासन?

CM Meet PM Modi : फडणवीसांची मोदींशी तासभर चर्चा, दिल्लीतून महाराष्ट्राला किती निधी अन् काय दिलं आश्वासन?

| Updated on: Sep 27, 2025 | 12:55 PM

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरून भरीव मदत करण्यासाठी राज्य सरकारन केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. त्यानंतर अधिक मदत करणार असल्याच आश्वासन मोदींनी दिल्याचं फडणवीसांनी सांगितल.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राज्याच्या पूरस्थितीसंदर्भात एक तास महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील भीषण पूरस्थितीबाबत सविस्तर निवेदन सादर केले. ज्यात महाराष्ट्रामध्ये 50 लाख हेक्टर वरील पिक नष्ट झाल्याची माहिती फडनविसांनी मोदीना दिली. शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्याच्या एसडीआरएफ मधून 2215 कोटींचा निधी देण्यात आला. पण भरीव मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीमधून अतिरिक्त निधी मिळावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली.

Published on: Sep 27, 2025 12:55 PM