Uddhav Thackeray : …. तरच शेतकरी जगेल, सातबारा चेक करा अन् हेक्टरी 50 हजार मदत करा, ठाकरेंची थेट मागणी

Uddhav Thackeray : …. तरच शेतकरी जगेल, सातबारा चेक करा अन् हेक्टरी 50 हजार मदत करा, ठाकरेंची थेट मागणी

| Updated on: Sep 25, 2025 | 6:06 PM

उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि कर्जमुक्तीची मागणी केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबार्या कोऱ्या करण्याचीही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यावर टीका केली आहे.

मराठवाड्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. लातूर आणि धाराशिव येथील पूरग्रस्त भागांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याची मागणी केली. त्यांनी शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याचीही मागणी केली. सरकारने जाहीर केलेल्या मदतीला त्यांनी अपुरी असल्याचे म्हटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यावर टीका केली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पर्यटन करण्याचा आरोप केला.

Published on: Sep 25, 2025 06:06 PM