Mumbai मधल्या कमला इमारत आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखाची मदत जाहीर

| Updated on: Jan 22, 2022 | 4:38 PM

मुंबईतल्या नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारत आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Follow us on

मुंबईतील (Mumbai) नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला (Kamla Building Fire) इमारतीला लागलेल्या आगीत आतापर्यंत आलेल्या माहितीनुासर 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. जखमींना नायर रुग्णालय, भाटिया रुग्णालय (Bhatia Hospital) आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आतापर्यंत 29 जण या आगीच्या तडाख्यात सापडल्याचं समोर आलं आहे. नायर रुग्णालयात दाखल केलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर, कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. सहा पैकी तिघांची ओळख पटलेली नाही तर हितेश मिस्त्री, मंजूबने कंथारिया आणि पुरुषोत्तम चोपडेकर यांचा मृत्यू झालाय. तर, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. तर, काही जणांना प्राथमिक उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाची होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. कमला इमारत 20 मजल्यांची असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली होती.