Maharashtra Local Body Elections : अखेर स्थानिक निवडणुकांचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान? अन् निकाल कधी?

Maharashtra Local Body Elections : अखेर स्थानिक निवडणुकांचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान? अन् निकाल कधी?

| Updated on: Nov 04, 2025 | 5:03 PM

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होईल. आयोगाने स्वच्छ, पारदर्शक निवडणुकांचे आश्वासन दिले आहे. मतदार यादीतील त्रुटींवर उपाययोजना करत असल्याचेही स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. १० नोव्हेंबर २०२५ पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होईल, तर १७ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत असेल. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हे वाटप करून अंतिम यादी जाहीर होईल. निवडणूक आयोगाने निवडणुका स्वच्छ, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात घेण्यासाठी दक्षता घेतल्याचे सांगितले.

मतदार यादीतील दुबार किंवा तिबार मतदारांबाबत उपाययोजना केल्या आहेत. जिथे असे मतदार आहेत, तिथे आयोगाचे प्रतिनिधी संपर्क साधून खात्री करतील. आयोगावर होणारे दबावतंत्राचे आरोपही फेटाळून लावत, निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असून, त्यात आढळणाऱ्या लिपिकीय चुका आणि प्रभाग बदलाचे दोष दुरुस्त केले जात आहेत.

Published on: Nov 04, 2025 05:03 PM