राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण नारायण राणेंना संपूर्ण समर्थन : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 24, 2021 | 1:55 PM

पुन्हा सांगतोय राणे साहेबांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण सरकार पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे ते पाहता भाजप राणेसाहेबांच्या पूर्ण पाठिशी आहेत. अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow us on

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परीषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, मात्र त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचं सांगितलं. पोलिसांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली जातेय. आम्ही हे सहन करणार नाही, क्रियेला प्रतिक्रिया येणारच आहे, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आपल्या कार्यालयावर पोलीस संरक्षणात चालून येत असेल तर भाजप कार्यालयाचं संरक्षण करावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नारायण राणे साहेबांना अटक केली तरी जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार, असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

पुन्हा सांगतोय राणे साहेबांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण सरकार पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे ते पाहता भाजप राणेसाहेबांच्या पूर्ण पाठिशी आहेत. अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई.. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.