Maharashtra Elections 2025 :  महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांमधील 23 नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका लांबणीवर, कारण काय?

Maharashtra Elections 2025 : महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांमधील 23 नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका लांबणीवर, कारण काय?

| Updated on: Dec 01, 2025 | 5:19 PM

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारामती, महाबळेश्वरसह अनेक ठिकाणांचा यात समावेश आहे. अचानक झालेल्या या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये नाराजी असून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती, महाबळेश्वर, पुणे, सातारा येथील नगरपालिकांसह २३ ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या आहेत. या २३ ठिकाणांमध्ये अमरावती, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागांमधील नगरपरिषदांचा समावेश आहे. एकूण २८८ जागांसाठी घोषणा झाली होती, त्यापैकी २ बिनविरोध तर २३ निवडणुका स्थगित झाल्या. आता २६३ जागांसाठी मतदान होणार आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, निवडणूक आयोगाने घाईघाईने निवडणुका जाहीर केल्याचे म्हटले आहे. काँग्रेस याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Published on: Dec 01, 2025 05:19 PM