‘मी फडणवीसांच्या जागी असतो तर उपमुख्यमंत्री पद घेतलचं नसतं’, कुणी लगावला टोला

‘मी फडणवीसांच्या जागी असतो तर उपमुख्यमंत्री पद घेतलचं नसतं’, कुणी लगावला टोला

| Updated on: May 07, 2023 | 12:33 PM

VIDEO | 'देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीशिवाय दुसरं काही दिसत नाही', उपमुख्यमंत्र्यांवर कुणी केली खोचक टीका

सोलापूर : राज्यातील नेते कर्नाटक वारीवर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस हे बेळगाव दौऱ्यावर असताना मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, असे वक्तव्य केले. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, ‘दिवसा स्वप्न फडणवीस बघतात त्यांना बघू दिले पाहिजे. मी पुन्हा येईल ते म्हणाले होते. ते कुठे मुख्यमंत्री झाले. मी असतो तर उपमुख्यमंत्री पदच घेतले नसते. महाराष्ट्राच्या त्याच खुर्चीवर परत येईल असे सांगितले होते. म्हणून त्याच खुर्चीवर बसेल नाहीतर साधा आमदार म्हणून काम करेल, असे माझं मत राहिले असते.’, असे ते म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, आमचे मित्र आहेत. त्यांना खुर्चीशिवाय काय दिसत नाही.

Published on: May 07, 2023 12:33 PM