Mumbai Rain : मंत्रालय परिसरात स्विमिंग पूल… गुडघाभर पाण्यातून नागरिक शोधताय वाट, बघा VIDEO
मुंबईत मे महिन्यातच जून सारखा पाऊस पडल्याने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. कुठे रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे तर कुठे गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरात आज पहाटेपासून जोरदार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील अनेक भागांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील सायन किंग्ज सर्कल भागात गुडघाभर पाणी साचलंय तर दादर येथील हिंदमाता येथे देखील पाणी भरलं आहे. तर दुसरीकजे मुंबईतील मंत्रालय परिसरात पाणी साचलं आहे. तर मंत्रालय परिसरात साचलेल्या गुडघाभर पाण्यात वाट काढत असताना नागरिकांची चांगलीच कसरत होत आहे. सकाळच्या वेळात मंत्रालयात कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं आहे. यासह बाईक आणि शासकीय काही वाहनं अर्धे पाण्यात बुडाले आहे. मंत्रालयाचा परिसर हा सखोल भाग आहे. त्यामुळे काही तास पडलेल्या पावसानेच मंत्रालय परिसरात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
Published on: May 26, 2025 11:59 AM
