Breaking | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मतदीसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर

| Updated on: Oct 07, 2021 | 2:55 PM

राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

Follow us on

राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तरी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी तात्काळ मदत बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.