Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फडणवीस मतं फिरवणार? नवे उपराष्ट्रपती कोण… राधाकृष्णन की सुदर्शन रेड्डी?
एनडीएच्या राधाकृष्णन यांच्या विरोधात काँग्रेसने मतांच्या खेळी करण्याचा प्रयत्न केलाय. इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी उमेदवार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मतांची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीसांवर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या प्रमुखांना फोन फोनाफोनी सुरू केली. एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत. तर इकडे राऊतांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी फोन करून मतांसाठी विनवणी केली असा टोला लगावलाय.
उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात आणि सध्याचा संख्याबळ पाहिलं तर लोकसभेचा संख्याबळ 543 आहे त्यापैकी एक जागा रिक्त आहे म्हणजे 542 खासदार आहेत. राज्यसभेचे 245 खासदार आहेत. त्यापैकी पाच जागा रिक्त आहेत म्हणजे एकूण मतदार आहेत 782 आणि जिंकण्यासाठी 391 मतं हवीत. भाजप आणि एनडीएकडे लोकसभेचे 293 आणि राज्यसभेचे 129 खासदार आहेत. म्हणजेच 422 खासदार एनडीएकडे आहेत. पण गुप्त मतदान असल्याने क्रॉस वोटिंगची शक्यता अधिक असते. काँग्रेस इंडिया आघाडीकडे लोकसभेचे 234 आणि राज्यसभेचे 78 असे मिळून 312 खासदार आहेत आणि 48 खासदार तटस्थ म्हणजे एनडीए किंवा इंडिया आघाडी कोणाकडेही नाही. हीच मतं निर्णायक ठरू शकतात.
