Nishikant Dubey : हिंमत असेल तर माहिमच्या मुस्लीमांना… राज ठाकरेंना दिलेल्या चॅलेंजवरून माहिमच्या रहिवाशानं दुबेंनाच सुनावलं

Nishikant Dubey : हिंमत असेल तर माहिमच्या मुस्लीमांना… राज ठाकरेंना दिलेल्या चॅलेंजवरून माहिमच्या रहिवाशानं दुबेंनाच सुनावलं

| Updated on: Jul 11, 2025 | 11:43 AM

राज्यात सध्या हिंदी-मराठी असा भाषा वाद चांगलाच रंगताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये एका अमराठी माणसाला मनसैनिकांकडून मारहाण कऱण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. अशातच भाजप खासदाराने महाराष्ट्राविरोधात वक्तव्य केलंय.

माहिममध्ये मुस्लिम आहेत, हिम्मत असेल तर तिथे जा. स्टटे बँक ऑफ इंडियाचा चेअरमन आंध्र प्रदेशचा आहे, तेलगु बोलतो, एलआयसीचा चेअरमन नॉर्थ ईस्टचा आहे. त्यांना मारहाण करुन दाखवा.’, असं वक्तव्य भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलं आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलं. निशिकांत दुबे असेही म्हणाले की, मराठी भाषेचा सन्मान आहे, कन्नड, तेलगु, तामिळचा भाषेचा सन्मान आहे. ती त्यांची ओरिजनल भाषा आहे. त्यांचं त्यांच्या भाषेवर प्रेम आहे. तसच उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांची हिंदी भाषा आहे. भाषेच्या आधारावर ठाकरे परिवार मारहाण करत असेल तर ते अजिबात सहन होणार नाही, असं स्पष्टपणे बोलल्यानंतर माहिममध्ये मुस्लिम लोकं जास्त असून हिम्मत असेल तर तिथे जा, असं चॅलेंज दुबेंनी राज ठाकरेंना दिल्यानंतर माहिममधल्या एका अमराठी भाषिक रहिवाशानेच निशिकांत दुबेला सुनावलं असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Published on: Jul 11, 2025 11:43 AM