अजितदादांनी झापलं, दिलगिरीवर निभावलं अन् कोकाटेंचं मंत्रिपद वाचलं!

अजितदादांनी झापलं, दिलगिरीवर निभावलं अन् कोकाटेंचं मंत्रिपद वाचलं!

| Updated on: Jul 29, 2025 | 4:41 PM

माणिकराव कोकाटेंची अजितदादांसोबत मंगळवारी 1 तास बैठक झाली. 1 तासाच्या बैठकीत माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी झापलं.

माणिकराव कोकाटेंची अजितदादांसोबत मंगळवारी 1 तास बैठक झाली. 1 तासाच्या बैठकीत माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी झापलं. तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची खूप प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आहे. हा विषय आता पुढे गेला आहे, मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंना सुनावलं आहे.
तर अजित पवार यांनी खडेबोल सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे सांभाळून आणि जबाबदारीनं बोलेन. अशी चूक पुन्हा करणार नाही, असंही यावेळी कोकाटे यांनी म्हंटलं. दरम्यान, कोकाटेंचे कार्यकर्तेही अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते. कोकाटेंचा राजीनामा घेऊ नका अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. त्या कार्यकर्त्यांनाही अजितदादांनी चांगलंच झापलं असल्याची माहिती समोर आली आहे. कोकाटेंनी बोलताना भान ठेवायला हवं होतं. कोकाटेंना मंत्रिपद दिलं त्यावेळी तुम्ही माझ्याकडे आला नाही. आता मंत्रिपद जाणार असं दिसल्यावर तुम्ही माझ्याकडे आलाय, हा विषय आता माझ्या हातात नाही, असं थेट उत्तर या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी दिलं आहे. तर कोकाटे दिलगिरीनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले. त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Published on: Jul 29, 2025 04:41 PM