Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी

Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी

| Updated on: Sep 16, 2026 | 8:43 AM

पाटोद्यात मुक्कामी असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक विधान केले आहे, "मला मुंबईत जाऊन मरू द्या." मराठा आरक्षणासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिघडलेल्या प्रकृतीमुळे आणि वैद्यकीय तपासणीनंतरही ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, समाजाच्या कल्याणासाठी ते बळी द्यायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्काम केला आहे. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी अत्यंत भावनिक विधान केले. “मला मुंबईत जाऊन मरू द्या”, असे म्हणत त्यांनी आरक्षणाच्या लढ्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याची तयारी दर्शवली.

जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून, पाटोद्यात डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. “रोज जर माझं असं झालं तर मी आठ दिवसात मरून जाईल”, असे त्यांनी म्हटले. मात्र, तरीही आरक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगत, समाजाच्या कल्याणासाठी एक बळी द्यावाच लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला गोळ्या घालून मारण्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला. समाजाच्या लेकरांसाठी आपण बळी द्यायला तयार असल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. पाटोद्यात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

Published on: Sep 16, 2026 8:43 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us