प्रकरण पेटलंच! मी चर्चेला तयार, मात्र आता चर्चादेखील रखरखत्या उन्हातच…  त्या पश्नवार जरांगेचं थेट उत्तर

प्रकरण पेटलंच! मी चर्चेला तयार, मात्र आता चर्चादेखील रखरखत्या उन्हातच… त्या पश्नवार जरांगेचं थेट उत्तर

| Updated on: May 30, 2026 | 10:46 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारकडून लेखी आश्वासन आणि मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काल राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. 58 लाख कुणबी नोंदी उपलब्ध असतानाही त्या प्रमाणात प्रमाणपत्रांचे वितरण का झाले नाही, असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच वाटप प्रक्रिया थांबवण्याचे आदेश कोणी दिले, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारशी चर्चा करण्यास ते तयार आहेत. मात्र आता चर्चा रखरखत्या उन्हातच होईल. उपोषणाला बसण्यापूर्वी ते भावूक झाले होते. समाजासाठी मरणालाही तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: May 30, 2026 10:46 AM
Follow Us