प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट…

प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट…

| Updated on: Aug 16, 2026 | 11:54 AM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला राजकीय पक्षांपेक्षा प्राधान्य देण्याचे आवाहन करत, समाजावर अन्याय करणाऱ्या नेते आणि सरकारवर टीका केली. एकजूट राहून आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याचे त्यांनी आवाहन केले, तसेच कुणबी प्रमाणपत्र आणि इतर मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली.

प्रकृती अस्वस्थ असूनही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तात्पुरता रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आणि कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा समाजाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्यावर मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला. त्यांनी अभ्यासक आणि समन्वयकांना पक्षाची बाजू सोडून समाजाच्या हितासाठी काम करण्याचा सल्ला दिला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना आणखी एक मोठं विधान केलं आहे. “जे केवळ नेत्यांना खूश करण्यासाठी येतात, त्यांनी अंतरवलीत येऊ नये,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. सरकार मराठा समाजावर जाणूनबुजून अन्याय करत असून, कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजापेक्षा सरकार मोठे नाही, हे दाखवून देण्यासाठी संपूर्ण समाजाला एकत्रितपणे लढावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मराठ्यांच्या एकाही लेकराचे प्रमाणपत्र जाऊ नये, यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Published on: Aug 16, 2026 11:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us