Manoj Jarange Patil : शिंदे साहेब खरा माणूस तर अजितदादा म्हणजे… जरांगेंकडून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्तुती, बघा काय केलं कौतुक?

Manoj Jarange Patil : शिंदे साहेब खरा माणूस तर अजितदादा म्हणजे… जरांगेंकडून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्तुती, बघा काय केलं कौतुक?

| Updated on: Aug 28, 2025 | 10:56 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मराठा समाजाचा ताफा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी आजाद मैदानावर आंदोलनाची एका दिवसाची परवानगी दिली आहे. परंतु जरांगे पाटील बेमुदत उपोषण करण्यावर ठाम आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांसह भगवं वादळ पुन्हा एकदा मुंबईत धडकलंय. मात्र मुंबईकडे येण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्तुती केल्याचे पाहायला मिळालंय. दरम्यान, जरांगे पाटील यांनी स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे साहेब हा माणूस खरा आहे. साथ देतो. जनतेची वेदना समजून घेतो. गोर-गरिबांच्या वेदना जाणून घेतो. सत्तेपेक्षा गोरगरिब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे तर गरिबांचे प्रश्न जाणून घेऊन ताबडतोब सोडवायचे, जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं हे काम तडकाफडकी अजित पवार करतात, असं म्हणत अजितदादांवरही मनोज जरांगे पाटील यांनी स्तुती सुमनं उधळली आहेत. तर मनोज जरांगे मुंबईकडे येत असल्याने एकनाथ शिंदे यांचा दरे गावाचा दौरा रद्द झालाय. दुसरीकडे भाजपच्या चित्रा वाघ आणि जरांगेंमध्येही जुंपली.

Published on: Aug 28, 2025 10:56 AM