हुंडा नव्हे तर मुलीच्या नावे FD…नो प्री वेडिंग अन् एवढ्या लोकांमध्येच लग्न; आता असं होणार मराठा समाजात लग्न?

हुंडा नव्हे तर मुलीच्या नावे FD…नो प्री वेडिंग अन् एवढ्या लोकांमध्येच लग्न; आता असं होणार मराठा समाजात लग्न?

| Updated on: Aug 04, 2025 | 1:10 PM

भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून मराठा समाजाने लग्नासंदर्भात एक आचारसंहिता समोर आणलीये. बघा त्यात नेमकं काय म्हटलंय?

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं. हुंड्यासाठी एका निष्पाप मुलीचा जीव गेला. आई-वडिलांची लाडकी लेक या जगातून कायमची गेली. हुंडाबळीचं हे एकच प्रकऱण नाही असे अनेक प्रकरणं समोर आलीत. अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन नुकतंच संपन्न झालंय. यामध्ये मराठा समाजातील लग्न आचारसंहितेची मराठा समाज घटकातील ११ सदस्यांना शपथ देण्यात आली. साखरपुडा-हळद लग्न एकाच दिवशी करावे, अशी शपथ यावेळी या ११ सदस्यांना देण्यात आली.

मराठा आचारसंहितेत नेमकं काय?

लग्न सोहळा ३०० ते ५०० लोकांमध्येच करावा, प्री वेडिंग बंद करावे. हुंडा देऊ नये आणि घेऊ नये. लग्नात डीजेऐवजी पारंपारिक वाद्य आणि लोक कलावंतांना संधी द्यावी. कर्ज काढून लग्न करू नये, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्यांना पायबंद घालावा. लग्न सोहळ्यात फक्त वर आणि वधू पित्यानेच फेटे बांधावेत. लग्नात सोन्याच्या वस्तू, गाड्यांच्या चाव्या देऊन देखावा करू नये. यासह रोख स्वरूपात रक्कम न देता पुस्तके द्यावीत, अन्नाची नासाडी थांबवावी. भांडी, फर्निचर न देता मुलीच्या नावाने एफडी करावी, सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावेत तर लग्नानंतर मुलीच्या संसारात हस्तक्षेप नको, सासरच्यांनी पैशांसाठी सुनेचा छळ करू नये

Published on: Aug 04, 2025 01:06 PM