Dada Bhuse : राज्यातील शाळांमध्ये मराठीसह इंग्रजी बंधनकारक पण हिंदीचं काय? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?

Dada Bhuse : राज्यातील शाळांमध्ये मराठीसह इंग्रजी बंधनकारक पण हिंदीचं काय? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?

| Updated on: Jun 18, 2025 | 12:33 PM

यंदा हिंदी भाषा पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून शालेय शिक्षण विभागाने घोषित केल्यानंतर मोठा विरोध झाला. त्यानंतर दादा भुसेंवर हा निर्णय मागे घेण्याची वेळ आली. मात्र हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे अधिकृत सांगण्यात आले नव्हते. मात्र आज दादा भुसे यांनी या वर्षी पहिलीपासून तिसरी भाषा नसेल, असे सांगितले.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असेल, असं राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय. यासह इतर भाषेच्या शाळांमध्येही मराठी भाषा अनिवार्य असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या आदेशात हिंदी अनिवार्य हा शब्द कुठे आहे? असा सवालही दादा भुसे यांनी केला. त्यामुळे हिंदी विषय घ्यायचा की नाही याचा निर्णय विद्यार्थी घेतील. नव्या आदेशानुसार, पहिलीपासून ते पाचवीपर्यंत हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे. तर हिंदीऐवजी इतर भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थी असणं अनिवार्य असणार आहे, असं दादा भुसे यांनी आज स्पष्ट केले. राज्यातील विद्यार्थी पाठी राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र राबविले जात असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. ते असेही म्हणाले की, दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा जास्त वापर होतो. त्यामुळे पालकांच्या मागणीनुसार हिंदी विषय शिकविला जाणार आहे.

 

Published on: Jun 18, 2025 12:33 PM