Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट

| Updated on: Aug 08, 2025 | 5:44 PM

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यात सुरूवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच सरकारकडून यासंदर्भात एक मोठी अपडेट देण्यात आली होती. आता २१०० रूपयांबद्दल काय म्हणाल्या तटकरे?

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन अर्थात ९ जुलैच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हफ्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली. यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेसंदर्भात मंत्री आदिती तटकरेंनी देखील भाष्य केले आहे. ‘लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० ऐवजी २१०० रूपये देण्याचा निर्णय शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि अजित पवार, मंत्रिमंडळ घेतील’, असं वक्तव्य आदिती तटकरेंनी केलं. ते कोल्हापूर येथे बोलत होत्या. पुढे त्या असंही म्हणाल्या की, ही योजना पुढे कायम अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे.

Published on: Aug 08, 2025 05:44 PM