Amit Shah : अजित दादांविरोधात भाजप आमदारांची तक्रार, शाहांनी त्यांनाच दिला कानमंत्र, म्हणाले…

Amit Shah : अजित दादांविरोधात भाजप आमदारांची तक्रार, शाहांनी त्यांनाच दिला कानमंत्र, म्हणाले…

| Updated on: May 28, 2025 | 12:55 PM

अजित पवार यांच्याविरुद्ध तक्रार करू नका. उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शाह यांनी आमदारांना केली. आपल्या महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे, असंह अमित शाह यांनी सांगितले.

कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा, अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, अजित पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना अमित शहा यांनी कानमंत्र दिल्याचे समोर आले आहे. आपली संख्या अधिक मागे हटू नका. महायुतीमध्ये आपण मोठे भाऊ आहोत, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भाजप आमदारांना अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अमित शाह हे नांदेड दौऱ्यावर आले असताना काही भाजप आमदारांनी अजितदादांची त्यांच्याकडे तक्रार केली. अजित पवारांच्या कुरघोड्यांना आवर घाला असा काहिसा नाराजीचा सूर त्यांच्या बोलण्यात होता. यानंतर शहांनी अजित दादांची तक्रार करणाऱ्या आमदारांना कानमंत्र दिला. अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. नांदेड येथे सभा घेतल्यानंतर ते मुंबईच्या दिशेकडे निघाले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील भूमिकेसह इतर अनेक राजकीय घडामोडींबाबत या दौऱ्यात मंथन झाल्याचे सांगितले जात आहे.

Published on: May 28, 2025 12:55 PM