मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर अन्…

मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर अन्…

| Updated on: Oct 04, 2024 | 11:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीच्या दर्शनाला 5 तारखेला येणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संजय राठोड हे 3 ऑक्टोबर रोजी पोहरादेवी या ठिकाणी गेले होते. ते रात्रीच्या सुमारास पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. त्यावेळी प्रवासादरम्यान आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात झाला.

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. यवतमाळच्या दिग्रस रोडवरील कोपरा भागात ही घटना घडली. अपघातात संजय राठोड यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. पण गाडीत असेलेल्या एअर बॅगमुळे संजय राठोड आणि चालक सुखरूप आहेत. तर मालवाहतूक करणाऱ्या गाडीतील चालक जखमी झाला असून संजय राठोड यांनी या चालकाला रूग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने संजय राठोड यांना या अपघातात कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळतेय. आज पहाटे २ वाजून १० मिनिटांनी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय राठोड हे यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे दौऱ्यावर गेले होते. यावेळी यवतमाळच्या आर्णी जवळील कोपरा येथे संजय राठोड यांच्या वाहनाने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक भीषण असल्याने माल वाहतूक करणारा पिकअप पलटी झाला आणि त्यातील चालक गंभीर जखमी झाला. तर संजय राठोड यांच्या कारचेही मोठे नुकसान असून कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

Published on: Oct 04, 2024 11:52 AM