संजय राऊत झुकणार नाहीत…

संजय राऊत झुकणार नाहीत…

| Updated on: Aug 01, 2022 | 10:43 AM

वी राणा यांच्यावर प्रतिक्रिया विचारल्यावरही रवी राणांची लायकी आहे का असा सवाल करुन राणांनी आपलं घर सांभाळावं असा इशारा संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिले आहेत.

खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल उलटसुलट चर्चा चालू असतानाच संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी मात्र ही सगळी प्रकरणं बोगस असल्याची टीका केली आहे. 1 हजार 34 कोटीचे पत्राचाळ घोटाळा हे प्रकरणच बोगस असल्याचे सांगत सोमय्या गँगचा हा राऊतांना अडकवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. यावर रवी राणा यांच्यावर प्रतिक्रिया विचारल्यावरही रवी राणांची लायकी आहे का असा सवाल करुन राणांनी आपलं घर सांभाळावं असा इशारा संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिले आहेत.