Special Report | उत्तर प्रदेशात गळती, गोव्यात भांडण?-TV9

| Updated on: Jan 14, 2022 | 8:55 PM

भाजपचे 9 बंडखोर आमदार समाजवादी पार्टीत (samajwadi party) पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Follow us on

उत्तर प्रदेश – जेव्हापासून उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या (UP Assembly Elections) तारखा जाहीर झाल्या आहेत, तेव्हापासून या पक्षातून त्या पक्षात जाणा-या बंडखोर आमदारांचे प्रमाण वाढले आहे. आज (bjp) भाजपचे 9 बंडखोर आमदार समाजवादी पार्टीत (samajwadi party) पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत भाजपच्या अनेक आमदारांनी अन्य पक्षात प्रवेश केल्याने भाजप समोर युपीत मोठे आवाहन उभे राहिले आहे. तसेच होणा-या निवडणुकीत भाजपला मोठा संघर्ष करावा लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. काल राज्याचे आयुष मंत्री, फिरोजाबादमधील शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा, सहारनपूरच्या नकुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार धरम सिंह सैनी, लखीमपूरमधील धौरहराचे आमदार अवस्थी बाला प्रसाद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.