MNS : ‘चमकू शुक्ला तू वाट चुकला, आता तुझी…’, मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शुक्लांना थेट इशारा

MNS : ‘चमकू शुक्ला तू वाट चुकला, आता तुझी…’, मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शुक्लांना थेट इशारा

| Updated on: Apr 09, 2025 | 2:39 PM

सुनील शुक्ला यांनी मनसे आणि मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी करणारी एक याचिका कोर्टात दाखल केली आहे. यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी थेच फोटो दाखवतच त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.

उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द व्हावी, या मागणीसाठी सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यानंतर मनसेचे सर्वच नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर गेल्या काही वर्षांपूर्वीचा सुनील शुक्ला यांचा मनसेच्या प्रचार रॅलीतील फोटो दाखवत प्रचार रॅलीतील सहभागाचा पुरावा मनसे नेते मनीष धुरी यांनी थेट टीव्ही ९ मराठीलाच दाखवला. यावेळी संवाद साधताना मनीष धुरी म्हणाले, ‘सुनील शुक्ला हा २००९ पासून मनसेचा सक्रीय कार्यकर्ता होता. मनसेच्या सर्व आंदोलनातही सुनील शुक्ला याचा सहभाग होता. पण अचानक आता महापालिका, म्हाडा, एसआरए या ठिकाणी आपले पत्ते कसे चालवायचे. यासाठी लाचारी दाखवत इतर पक्षांबद्दल काहीतरी बोलून मनसेला डिवचलंय. पण मनसे याला भीक घालत नाही’, असे मनीष धुरी म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटलं की, चमकू शुक्ला तू वाट चूकला, आता तुझी मनसेची गाठ आहे, असं म्हणत सुनील शुक्लाला इशारा दिला आहे.

Published on: Apr 09, 2025 02:39 PM