आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? राज ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल

आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? राज ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल

| Updated on: Jun 13, 2024 | 1:21 PM

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाचे बॅनर झळकवण्यात आल्याचे दिसत आहे. दरम्यान, याच बॅनरमधून मनसेकडून विधानसभेचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता राज ठाकरे यांच्याकडून संदीप देशपांडे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे दिसतंय.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे हे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विधानसभा लढण्याचे संकेत मिळताना दिसत असताना आता राज ठाकरे यांच्याकडून संदीप देशपांडे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे दिसतंय. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाचे बॅनर झळकवण्यात आल्याचे दिसत आहे. दरम्यान, याच बॅनरमधून मनसेकडून विधानसभेचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, उद्या १४ जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने संदीप देशपांडे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकवले आहेत.

Published on: Jun 13, 2024 01:21 PM