Raj Thackeray : … अशी झाली राज ठाकरेंची विजयी मेळाव्यास्थळी रूबाबदार एन्ट्री, बघा व्हिडीओ
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन दशकानंतर एकाच व्यासपीठावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येताना दिसणार आहे. ते नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय.
ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यासाठी आयोजित केलेल्या विजय मेळाव्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील वरळी डोम येथे कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत. यावेळी असंख्य कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंचं मनोमिलन झालं आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंचं मेळाव्यास्थळी स्वागत केलं. राज ठाकरे यांच्या गाडीभोवती कित्येक मनसैनिक बघायला मिळाले. या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाच वेळी मेळाव्यास्थळी निघाले होते. उद्धव ठाकरे हे मेळाव्यास्थळी दाखल झाल्यानंतर काहीच क्षणात राज ठाकरे हे दाखल झाले. राज ठाकरेंच्या रूबाबदार एन्ट्रीची सध्या चर्चा होतेय.
Published on: Jul 05, 2025 12:10 PM
