तर महाराष्ट्राची परिस्थिती यूपी-बिहार सारखी होईल, राज ठाकरे यांनी काय व्यक्त केली चिंता

| Updated on: Mar 21, 2023 | 9:27 PM

VIDEO | लोकमान्य सेवा संघ शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणावर काय केले भाष्य ?

Follow us on

मुंबई : लोकमान्य सेवा संघ शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य करत विविध विषयांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केले आहे. १९९५ सालच्या अगोदरचा महाराष्ट्र आणि १९९५ नंतरचा महाराष्ट्र वेगळा आहे. सध्या सुरू असलेलं राजकारण, समाजकारण हे पूर्णपणे बदललं आहे. महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे अशी परिस्थिती कधीच बघितली नाही. राजकाराचा ऱ्हास हा खरा १९९५ नंतर सुरु झाला. त्यामुळे आज मध्यमवर्ग मुला-मुलींनी राजकारणात येण्याची गरज असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. अन्यथा महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश, बिहारसारखी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.