Raj Thackeray : पोटात साचलेली मळमळ, ‘ते’ विधान म्हणजे… IIT बॉम्बेच्या नावावरून राज ठाकरेंचा जितेंद्र सिंग यांच्यावर घणाघात

Harshada Shinkar | Updated on: Nov 26, 2025 | 1:41 PM

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांच्या आयआयटी बॉम्बे नावाविषयीच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. हे वक्तव्य सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक असून, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मनसेने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआयटी बॉम्बेच्या नावावरून केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. “आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई केलं नाही हे चांगलंच झालं”, असे वक्तव्य सिंग यांनी केले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, हे वक्तव्य सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा अनेक दशकांपासून सुरू असलेला डाव हे वक्तव्य उघड करते. त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मुंबई महानगरपालिका आहे, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाहीये”, असे स्पष्ट करत शहराचे नामांतर शासकीय राजपत्रात (गॅझेट) आल्याने ते सर्व संस्थांना बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. मनसेने जितेंद्र सिंग यांच्या मुंबई दौऱ्यावेळी उचित सन्मान आणि सत्कार करण्याचे संकेत दिले आहेत.

Published on: Nov 26, 2025 1:41 PM
Follow Us