माहिमच्या दर्गाह अनाधीकृत बांधकाम हे… ; मनसे नेत्याने मविआवर खापर फोडले

| Updated on: Mar 23, 2023 | 10:21 AM

यावेळी देशपांडे यांनी, जी गोष्ट अनिधीकृत आहे ती तोडण्यासाठी म्हणून प्रशासन तत्परतेने जागा झाले त्याबद्दल अभिनंदन मानले आहेत.

Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताच आता कारवाईला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाईला सुरूवात केली. तसेच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सरकारचे आभार मानत अभिनंदन केलं आहे.

यावेळी देशपांडे यांनी, जी गोष्ट अनिधीकृत आहे ती तोडण्यासाठी म्हणून प्रशासन तत्परतेने जागा झाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तर या बांधकामा बाजूला सागरी मार्ग पोलीस स्टेशन आहे. त्यांना याची माहिती होती. तर जे बांदकाम झाले ते कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं का जाणीवपूर्वक त्यांना दुर्लक्ष करायला लावलं हा संशोधनाचा विषय असल्याचेही ते म्हणाले.