Raj thackeray :  लपवाछपवी कशासाठी? मतदार यादीतील घोळ अन् आयोगाच्या भूमिकेवरून राज ठाकरेंनी घेरलं

Raj thackeray : लपवाछपवी कशासाठी? मतदार यादीतील घोळ अन् आयोगाच्या भूमिकेवरून राज ठाकरेंनी घेरलं

| Updated on: Oct 15, 2025 | 12:44 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार नोंदणी बंद करण्यामागील लपवाछपवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगाच्या बैठकीत उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि बाळासाहेब थोरात यांनीही मतदार यादीतील घोळ, त्रुटी आणि यंत्रणेच्या सज्जतेवर चिंता व्यक्त करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

राज्यात कोणताही निवडणूक कार्यक्रम नसताना मतदार नोंदणी बंद करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात निवडणूक आयोगावर थेट सवाल उपस्थित केला आहे. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादी का दाखवली जात नाही, अशी विचारणाही त्यांनी केली. एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटी आणि घोळावर चर्चा केली.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न विचारला आणि प्रत्येकजण जबाबदारी झटकत असल्याची खंत व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांनीही यंत्रणा सज्ज नसताना निवडणुका घेण्यावर आक्षेप घेतला. बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेल्या त्रुटींवर काम झाले नसल्याचे म्हटले. या सर्व नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पारदर्शकतेची मागणी केली आहे.

Published on: Oct 15, 2025 12:44 PM