Raj Thackeray : … ते फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंचा भाषणाच्या सुरूवातीलाच खोचक टोला

Raj Thackeray : … ते फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंचा भाषणाच्या सुरूवातीलाच खोचक टोला

| Updated on: Jul 05, 2025 | 12:31 PM

'खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली.', असं राज ठाकरे म्हणाले.

‘सन्मानिय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी माता भगिनींनो…’, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्याच्या भाषणाची दणक्यात सुरूवात केली. यावेळी भाषणातून त्याची नेहमीची बोलण्याची शैली पाहायला मिळाली. राज ठाकरे म्हणाले, खरं तर दोघांची भाषणं संपल्यावर एकत्र आरोळ्या ठोका. इतकंच नाहीतर जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असं म्हणत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला.

पुढे ते असेही म्हणाले, आजचा मेळावा शिवतिर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे. त्यामुळे मुंबईत जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत. त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आता स्क्रिनवर आटपा. मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यातून या गोष्टी सुरू झाल्या,. कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी म्हटलं होतं. २० वर्षानंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत.

Published on: Jul 05, 2025 12:31 PM