MNS: मनसेच्या गोटातून मोठी अपटेड, येत्या 18 जुलैला काय घडणार? मीरा-रोडच्या आंदोलनानंतर राज ठाकरे स्वतः…

MNS: मनसेच्या गोटातून मोठी अपटेड, येत्या 18 जुलैला काय घडणार? मीरा-रोडच्या आंदोलनानंतर राज ठाकरे स्वतः…

| Updated on: Jul 10, 2025 | 4:57 PM

मीरा-भाईंदर येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून मराठीच्या मुद्द्यावरून एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांकडून मनसेविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून मराठी मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आता राज ठाकरेंच मीरारोड येथे जाणार आहेत.

मीरा रोडमध्ये मराठीसाठीचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेकडून आता मोठं पाऊल टाकण्यात येतेय. येत्या १८ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोडच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी राज ठाकरे मीरा रोड येथे सभा घेणार असल्याचीही माहिती मिळत आहे. नुकताच मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसेकडून मीरा-रोड येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आता मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या १८ जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता राज ठाकरे मीरारोड येथे दाखल होणार आहे. मनसेच्या आंदोलनानंतर राज ठाकरे मीरा रोडच्या दौऱ्यावर जात असल्याने सर्वांचं लक्ष राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे लागलेले आहे. कारण यावेळी राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात, याची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. दरम्यान, मीरा-रोडच्या आंदोलनानंतर राज ठाकरे मीरा रोडमध्ये जात मराठी जनतेचे आभार मानणार असल्याची माहिती मिळतेय.

Published on: Jul 10, 2025 03:25 PM