India Mock Drill : भारताकडून युद्धाची पूर्व तयारी अन् पाकला भरली धडकी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना दिले आदेश; 7 मे रोजी….
उद्या देशभरात ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले. या नंतर पाकिस्तान आणखी घाबरला आहे. तर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत कधीही एलओसीवर मिलिट्री स्ट्राइक करणार असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानविरोधात भारत युद्ध करण्यासाठी सज्ज आहे. याकरता भारताकडून पूर्व तयारी सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना सुरक्षेसंदर्भात आता मॉक ड्रिल करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर उद्या 7 मे रोजी संरक्षण सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे हे निर्देश देण्यात आलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचे ही आदेश आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचेही आदेश देण्यात आले. यानंतर पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे.
गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना असे आदेश
7 मे रोजी एकाच वेळी सर्व राज्यात मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले आहेत.
हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवा.
युद्धकाळात नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना जनतेला स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्या.
दुर्घटनेच्या वेळी एकाच वेळी काळोज करण्याचे नियोजन करा.
महत्त्वपूर्ण संस्था आणि प्रतिष्ठान सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या.
हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी योजना आखून तयारी करा.
