VIDEO : Narendra Patil | अडवलेल्या मराठा बांधवांना मोर्चास्थळी सोडणार नाही, मोर्चा निघणार नाही-नरेंद्र पाटील
राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही.
राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे. सातारा आणि सांगलीतून पोलीस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकले आहे, असं सांगतानाच आज सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली. पण मराठ्यांचा आवाज दाबला तर यदाकदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू. तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, अडवलेल्या मराठा बांधवांना मोर्चास्थळी सोडणार नाही, मोर्चा निघणार नाही
Published on: Jul 04, 2021 01:28 PM
