खासदार संजय राऊत यांना विशेष ईडी न्यायालयात हजार केले

| Updated on: Aug 01, 2022 | 3:26 PM

ईडीकडून संजय राऊत याच्या कोठडीची मागणी करण्यात येईल . ईडीकडून(ED) वकील नितीन वेंगावांकर हे युक्तिवाद करणार आहेत. तर संजय राऊत यांची बाजू ऍड अशोक मुंडराज बाजू मांडणार आहेत.

Follow us on

मुंबई – शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत(Sanjaya raut) यांना काल ईडीने अटक केली. त्यानंतर आज संजय राऊत यांना विशेष ईडी न्यायालयात(ED court) हजार करण्यात आले आहे . एम. जी . देशपांडे यांच्या खंडपीठाकडून कोर्टामध्ये राऊत यांना हजर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सुनावणीला सुरवात होणार आहे. या सुनावणीत ईडीकडूने नेमका काय युक्तिवाद केला जातोय ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ईडीकडून संजय राऊत याच्या कोठडीची मागणी करण्यात येईल . ईडीकडून(ED) वकील नितीन वेंगावांकर हे युक्तिवाद करणार आहेत. तर संजय राऊत यांची बाजू ऍड अशोक मुंडराज बाजू मांडणार आहेत.