VIDEO : नव्या संसदेत मोठ-मोठ्या स्क्रिन, TV वर झळकण्यासाठी खासदारांची धडपड तर बघा… कुठं जागेवरून वाद तर कुठं….
संसदेमध्ये भाषण सुरू असताना काही खासदार लोकसभा टीव्हीवर झळकण्यासाठी धडपड करत असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगतेय. दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होताहेत पाहूयात.
लोकसभेत भाषणावेळी आपण टीव्हीवर झळकाव म्हणून अनेक खासदाराची धडपड सुरू असल्याची चर्चा सध्या काही व्हिडिओमुळे होऊ लागली आहे. सोशल मीडियात दोन भाषण चांगलीच व्हायरल होताहेत. नव्या संसदेत कामकाज कसं प्रसारित होत आहे टीव्ही कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कोणकोण दिसत आहे हे समोर लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर दिसतं. त्याचमुळे एखादा नेता बोलत असताना आपणही त्या फ्रेममध्ये यावं यासाठी काही खासदार धडपड करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्य बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या खासदाराचा चेहरा कॅमेऱ्यातून कट होत होता. त्यामुळे ते वेगाने उठून पुढच्या रांगेला बसायला आले. त्याच वेळी समोरून आलेल्या दुसऱ्या खासदाराला सुद्धा त्याच जागेवर बसायचं होतं. मात्र एकीकडे भाषण सुरू असताना त्या जागेवर कोण बसतं यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यांच्या बाजूला बसलेल्या खासदाराची जागा आधीच फिक्स झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि जागा न मिळाल्यामुळे एक खासदार तर चक्क दुसऱ्या रांगेत जाऊन बसले आणि फ्रेम मध्ये आल्याच पाहून त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान झळकलं.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होतो आहे. ते बोलायला उभे राहिल्यानंतर लगेच खासदार श्रीरंग बारणे पुढे आले त्यांची एक नजर समोरच्या स्क्रीनकडे गेली. नंतर ठाण्याचे खासदार नरेश मस्के हे सुद्धा फ्रेममध्ये आले आणि खासदार संदीपान भूम्हरेनी देखील थोडं बाजूला होऊन स्वतःला फ्रेममध्ये ऍडजस्ट केल्याचे पाहायला मिळाले.
