MSRTC : लालपरीच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, गणपतीआधीच पुढील महिन्याचा पगार खात्यात होणार जमा?

MSRTC : लालपरीच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, गणपतीआधीच पुढील महिन्याचा पगार खात्यात होणार जमा?

| Updated on: Aug 22, 2025 | 12:25 PM

सामान्यतः महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच जमा केला जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिल्याची माहिती आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिल्याची मोठी माहिती समोर येत आहे. आजच्या आज वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाइल सादर करण्याचे आदेश देखील  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याचसोबत वित्त विभागात देखील बोलणी करून एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी एक ते दोन दिवसात हस्तांतरीत करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनंती केली आहे.

दरम्यान, जर वित्त विभागाकडून सोमवारपर्यंत निधी आला तर सोमवारी किंवा मंगळवारीच एस टी कर्मचाऱ्यांचे पगार होणार, अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय. दर महिन्याला उशिरा पगार मिळणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना या महिन्यात गणेशोत्सवापूर्वी पगार लवकर मिळणार की नाही? एस टी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार की नाही ? याकडे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक मोठा सण असल्याने, या काळात कर्मचाऱ्यांचे खर्च वाढतात. त्यामुळे वेळेवर पगार मिळाल्याने त्यांना सण चांगल्या प्रकारे आनंदात साजरा करता येईल.

Published on: Aug 22, 2025 12:25 PM