MSRTC : आर्थिक संकटात सापडलेल्या ‘लालपरी’ला दिलासा, कारण एसटीला आता…

MSRTC : आर्थिक संकटात सापडलेल्या ‘लालपरी’ला दिलासा, कारण एसटीला आता…

| Updated on: Jul 31, 2025 | 10:12 AM

एसटीला इंधन खरेदीत वाढीव सवलत मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एसटी मंडळाची वर्षाला साधारण ११ कोटींची बचत होणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या एसटीला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीला इंधन खरेदीत वाढीव सवलत मिळणार आहे. इंडियन ऑइल  आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून एसटीला प्रति लिटर ३० पैसे अतिरिक्त सवलत मिळणार आहे. यामुळे एसटी महामंडळाची वर्षाकाठी सुमारे ११ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती समोर येतेय.  एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक असल्याने, अशा प्रकारच्या सवलतीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीला मोठा दिलासा मिळणार आहे. ही बचत एसटीच्या आर्थिक सक्षमतेसाठी मदत करणारी असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. गेली ७० वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ या कंपन्यांकडून डिझेल खरेदी करत आहे आणि दररोज त्यांना सरासरी १०.७८ लाख लिटर डिझेल लागत असल्याची माहिती आहे.

Published on: Jul 31, 2025 10:12 AM