Special Report | निवडणुकांमधला बदल कोणाच्या पथ्यावर?

Special Report | निवडणुकांमधला बदल कोणाच्या पथ्यावर?

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 9:33 PM

आगामी महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकी संदर्भात मोठा निर्णय झाला आहे. मुंबई महापालिका सोडून इतर ठिकाणी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होणार आहेत.

आगामी महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकी संदर्भात मोठा निर्णय झाला आहे. मुंबई महापालिका सोडून इतर ठिकाणी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हा मोठा बदल कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे.

Published on: Sep 22, 2021 09:32 PM